Ticker

6/recent/ticker-posts

नायगाव तालुक्यावर अतिवृष्टीचे सावट.



भगवान ढगे अंतरगाव प्रतिनिधी.

दि.28/08/2025 ते 29/08/2025 दरम्यान नांदेड जिल्ह्यातील सर्वत्र नायगाव तालुक्यावर अतिवृष्टीचे सावट आले आहे दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नायगाव तालुक्यात सर्वत्र शेती पिकांचे नुकसान झालेले आहे व ठीक ठिकाणी घरांची पडझड ही झालेली आहे त्यामध्ये सर्व सामान्य शेतकऱ्यांचे जास्तीचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीचे संकट येण्याची शक्यता आहे शासनाने सर्वतोपरी मदत शेतकऱ्यांना जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे व जिथे नुकसान घरांचे पडझड झालेले आहे तिथे तिथे सर्व मंडळाचे तलाठी यांनी ठिकठिकाणी जाऊन पाहणी करून सुरक्षित ठिकाणी जाऊन राहण्याच्या नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत.