आदमपूर ग्रामीण प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील विद्यमान पोलीस पाटील योगेश्वर गंगादास पेंटे हे १५ जून २०२५ रोजी घेण्यात आलेल्या मराठी विषयात सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.शनिवार दि.३० ऑगस्ट रोजी सायंकाळी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे.सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही वरील परीक्षा घेण्यात येते.
सेट ही राज्यस्तरीय पाञता परीक्षा चाचणी असून,या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करू शकतात.बहुपर्यायी पश्नपञिकेचा समावेश या चाचणी परीक्षेत असतो.या परीक्षेचे आयोजन युजीसी द्वारे मान्यताप्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारे केले जाते. सदरील परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाते आणि उमेदवार पदवीधर असणे बंधनकारक असते.
सेट उत्तीर्ण झाल्याबद्दल पोलीस पाटील योगेश पेंटे यांचे पोलीस विभाग,पेंटे परिवार,व्यावसायिक,पञकार,मिञ परिवार,सहशिक्षक,प्रतिष्ठित आदमपूर गावकरी,आजी माजी पदाधिकारी,शेतकरी आदिंनी अभिनंदन केले आहे.





Social Plugin