Ticker

6/recent/ticker-posts

टाकळी येथे पुरात अडकलेल्या तरूणास बचाव पथकाने वाचविले



(२ तास राज्य आपत्ती बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सफल)

आदमपूर ग्रामीण प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील टाकळी-वझरगा परिसरातून वाहणाऱ्या मन्याड नदीच्या रोडवरील प्रवाहामुळे एक इसम पाण्यात वाहून जाऊन प्रसंगावधान राखत शेत शिवारातील सागवानाच्या झाडावर आश्रय घेतलेल्या तरूणाचे जीव एसडीआरफ अर्थात राज्य आपत्ती बचाव पथकाच्या दलाने शनिवार दि.३० ऑगस्ट रोजी तब्बल साडे तीन तास(सकाळी ८:३० ते १०:३० पर्यंत)शर्थीचे प्रयत्न करून वाचविण्यात यश मिळाले आहे.

अटकळी-टाकळी सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी प्रणिता काळे यांनी सकाळी ८:३० वाजता बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर सदरील तरूणास काढण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. संबंधित देगलूर नगरपरिषद देगलूर एसडीआरएफ बचाव पथकाची कामगिरी कौतुकास्पद ठरल्याने उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

पुरातील मनुष्य मौजे वझरगा गावचा रहिवासी असून मारूती हाणमंत कोकणे असे त्याचे नाव होते.स्थानिक लोकांकडून महामार्ग ओलांडताना वरील तरूणास मज्जाव करण्यात आला होता.पण,तो दाद न देता पुढे पुढे जात राहिला असे सर्वांचे म्हणणे होते. वाहतूक अजुनही ठप्प होती.पाणी काहीसे संथ होताना दिसत होते.आदमपूर,केरूर,खतगांव,अटकळी परिसरातील लोकांची 'रेस्कू ऑपरेशन' मोहीम पाहताना प्रचंड गर्दी झालेली होती.

बचाव कार्यात देगलूर-बिलोली प्रशासन,बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे,देगलूर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील,नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड,सहाय्यक महसूल अधिकारी राजेश्वर आलमवाड,देगलूर मुख्याधिकारी निलम कांबळे,देगलूर पोलीस निरीक्षक मारोती मुंडे,तहसीलदार भारत सुर्यवंशी,तहसीलदार गजानन शिंदे,आदमपूर बीट जमादार रामचंद्र काळे,होमगार्ड कर्मचारी, मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर,ग्राम महसूल अधिकारी मिलिंद सुपेकर, रातोळीकर, महसूल सहाय्यक शेख युनूस, आशिष आंबोडे, वाहनचालक गिरीजाजी टेकाळे,पोलीस पाटील योगेश पेंटे,सेवक सिद्धेश्वर वाघमारे,बोटचालक कर्मचारी,शिवाजी घोंगडे,चव्हाण,ललित पाटील, प्रल्हाद गुडपे,वझरगा,टाकळी, अटकळी सरपंच,कोतवाल,पञकार काशिनाथ वाघमारे,अंकुशकुमार देगांवकर,जाफर आदमपूरकर,गणेश कदम,विलास शेरे,मारोती भुसावळे,महमदरफी मदार आदिंची विशेष उपस्थिती होती.दुपारी बिलोली भागातील कासराळी,नागणी,हरनाळी व इतर काही गावांमध्ये नांदेड जिल्ह्याचे पालकमंञी अतुलजी सावे यांचा धावता पाहणी दौरा झाला.

हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान,घरांची पडझड,मृत जनावरे आदि चिंताग्रस्त बाबींसाठी भाजपा बिलोली पूर्व मंडळ तालुकाध्यक्ष मारोती राहिरे यांनी निवेदन सादर केले.सोबत देगलूर-बिलोली आमदार जितेश अंतापूरकर, जिल्हाधिकारी राहूल कर्डिले व जिल्ह्य़ातील संबंधित विभागाचे महसूल पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.