Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्वा भोरजे हिचे प्रेरणादायी भाषण



देगलूर- प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर, नांदेड-3 सिडको येथील संत मीरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थिनी पूर्वा समाधान भोरजे (इयत्ता सातवी, तुकडी ब) हिने प्रभावी भाषण करून उपस्थितांचे मन जिंकले.

पूर्वाने आपल्या भाषणात सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत भारताच्या स्वातंत्र्याची कहाणी सांगितली. तिने सांगितले की, “15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले, पण हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले.”

तिने विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना आवाहन केले की, “आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य जसं आहे तसंच टिकवणं आपली जबाबदारी आहे.” भाषणाच्या शेवटी तिने देशभक्तीपर शायरी सादर करून वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगवले –

“आजादी की कभी शाम न होने देंगे,

शहीदों की कुर्बानी बदनाम न होने देंगे,

जब तक एक भी बूंद लहू की रगों में,

तब तक भारत माँ का आंचल नीलाम न होने देंगे.”

कार्यक्रमाला प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.