Ticker

6/recent/ticker-posts

भुरभुशी ह्या गावात गेल्या 10 वर्षांपासून गावात रस्ता नाही

 


भोकर प्रतिनिधी  दिपक तोडे 

भुरभुशी ह्या गावात गेल्या 10 वर्षांपासून गावात रस्ता नाही, नाली साप करत नाही, पिण्याचे फिल्टर फ्लॅन्ट मानव विकास मिशन वरून आलेल्या योजना काही दिवस चालवले, आता बंद पाडले. मोदीच्या पाईप लाईन चे खोदकाम केले व त्यावर सिमेंट रस्ता केले नाही मुरूम टाकून ते रस्ता बनवले , गावकऱ्यांना चिखलामुळे त्रास होत आहे गावातील दहा वर्ष्यापासून स्मशान भूमीची व्यवस्था नाही. स्मशानभूमी चा रस्ता केले पण स्मशानभूमी रस्ता आहे पण स्मशानभूमी बांधली नाही, गावात पाण्याचा वारंवार दुष्काळ पढतो. पिण्याच्या पाण्याची मोटार एकदा जळल्यावर मोटर दुरुस्ती साठी गावातून पट्टी जमा करून दुरुस्ती करावं लागते. मंग ग्रामपंचायत कशासाठी आहे. वाचनालय सुविधा नाही. तरुण मुलांसाठी झिम ची सुविधा कुठं गायब झाली आहे काय तपास नाही. गावात कॉम्पुटर ऑपरेटर ची जागा कोणाकडे दिली काय माहीत नाही. संग्राम विभागाचा पगार कोण उचलतात तेही कळत नाही. गावात विहिरीचे योजना प्रत्येक गावात येतात पण आपल्या गावात ते योजना देण्यासाठी भेदभाव करतात. काही लोकांनाच विहिरी दिल्या, घरकुल योजना गावातील सर्वांना येत असते पण सरपंचाने घरकुल मंजूर करण्यासाठी घरकुल वाल्यांकडून दहा, दहा हजार रुपये घेतात ती तर शासनाची योजना आहे ना मग त्याच्यामध्ये भेदभाव का? असा प्रश्न नागरिकांचा आहे, बाकी नागरिक काय बाहेर गावचे आहेत काय तुम्ही गावाचे प्रतिनिधी काय काम करता काय कामाचे .जर गोर गरीब नागरिक हे सगळं जवाब विचारल्यावर त्यांच्यावर दबाव टाकल्यावर त्यांनी न्याय कोणाकडे मागायचं कोणाला.निवडणूक जवळ आल्यावर सगळ्यांना हात झोडून मत मागण्यासाठी घरोघरी फिरता तसाच कोणाला काय अडचण आहेत विचारू शकता का?. गेल्या 10 वर्षांपासून गावचा विकास काय झालंय गावात 80% बेरोजगार ची संख्या जास्त असल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेता का.बाहेर गावाचे सरपंच पैसे खात असेल पण गावाचा काही तरी विकास करतात आपल्या गावात असा विकास काहीच नाही. 10 वर्ष्यापासून एवढा अन्याय सहन करत आहोत. कारण तुम्हांला कोणी विचारणार नाही मनाचे राजा तुम्ही.गावात ग्रामसेवक हा गावात कधी येत नसतो.त्यांचा पण BDO साहेबाकडे तक्रार द्यावं लागेल.शासना कडून दर वर्षी भरपूर योजना आहेत आपल्या गावा पर्यंत कोणत्याच योजना पोहचू देणार नाहीत. असा जर तुम्ही वागलं तर विकास काय होणार, शेजारच्या गावा पेक्षा 10 वर्ष्यानी आपलं गावं पाठीशी आहे. काही तरी तुमच्या मनाला वाटू दे या दोन महिन्या मध्ये निवडणूक आहे, जो काम करेल त्यांना संपूर्ण गाव तुम्हाला पाठिंबा राहील. हे लक्ष्यात ठेवा..

80% बेरोजगार आहेत ह्याचा 100% वापर केला जातो ही सत्य परिस्थिती आहे भुरभुशी ह्या गावची