राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : बनावट इंजिनीअरच्या शिक्क्याने बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी दिग्रस पोलिसांनी केली.
निखिल भाऊसिंग चव्हाण (रा. महेशनगर, दिग्रस) असे आरोपीचे नाव आहे. त्यांचे तहसील चौक येथे सामतदादार कॉम्प्युटर टाइपिंग आणि ऑनलाइन सेंटर आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने सुरू केलेल्या बांधकाम कामगार योजनेत लाभ घेण्यासाठी ९० दिवसांचे ठेकेदाराकडे काम केलेले दाखले आवश्यक असतात. यासाठी संबंधित आरोपीने बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चक्क बकऱ्या चारणाऱ्या व्यक्तीच्या नावाने इंजिनीअरचा बनावट शिक्का तयार केला. त्याद्वारे त्याने लाभाथ्यर्थ्यांकडून पैसे उकळून अनेकांची फसवणूक केली.
याप्रकरणी राजेश जलसिंग चव्हाण यांनी दिग्रस पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३४१ (२), ३४१ (३) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच पोलिसांनी बनावट शिक्का देखील जप्त केला आहे.





Social Plugin