Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेगावचे क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश.



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे]


 श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ.राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल, पुसेगाव  या शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धत   यश संपादन केले.  इयत्ता .९ वी  मधील विद्यार्थी 

स्वराज गजानन  चव्हाण या विद्यार्थ्याने   जिल्हास्तरीय थांगता स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील गटामध्ये सुवर्णपदक मिळवून यश संपादन  केले.  

स्वराजची पुढील अमरावती या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच पुसेसावळी या  ठिकाणी  झालेल्या तालुकास्तरीय योगा  स्पर्धेमध्ये इयत्ता ८वी मधील विद्यार्थिनी कु.असावरी विजयकुमार जाधव  हिने १४ वर्षाखालील मुली या वयोगटात तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. तिची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  विद्यालयाचे क्रीडा शिक्षक ठोंबरे सर  यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या दोघांच्या निवडीबद्दल व यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव ,उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव , सचिव मोहनराव जाधव , खजिनदार लक्ष्मणराव जाधव व सर्व पदाधिकारी, गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापिका. कु  धनश्री पोतदार , प्रशासकीय अधिकारी डी.पी शिंदे सर ,क्रीडा शिक्षक श्री ठोंबरे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .