कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा लाड पोहा, जि, वाशिम चे भुमी पुत्र इंडियन एअर फोर्स मध्ये एअर मन या पदावर कार्यरत असताना दिनांक, 29 ऑगष्ट 1982 रोजी शहीद झाले तसेच ते वसंत विद्यालय पोहा चे एक आदर्श विद्यार्थी तर होतेच. कुठल्याही शिकवणी शिवाय ग्रामीण भागातील, एच, सी, परिक्षेत इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून अकोला जिल्ह्यात सर्व प्रथम येणारा होतकरू, भुमीहिन आई बाबांचा सर्वात धाकटा,, गुरुजनाचा, आवडता शाळेला नावलौकिक मिळवून देणारा विद्यार्थी. देशसेवेसाठी भारतीय नौसेनेत दाखल झाला खरा पण नियतीला त्यांची दिर्घकाळ देशसेवा मंजूर नव्हती की,, काय
तर वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी भारत सिमेवर त्यांना वीरमरण प्राप्त झाले. म्हणून वसंत विद्यालय पोहा त्यांच्या स्मरणार्थ 29 ऑगष्ट 1983 पासुन पुण्यतिथी साजरी करतात, या वर्षी, विद्यालयात श्री विठ्ठल भुसारे मुख्याध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रा, उमेश दहातोंडे, यांनी प्रतिमेला हारार्पन करून भावभिनी श्रद्धांजली अर्पण केली,, विद्यालयाचे शिक्षक वृंद सर्व श्री, नरेश सुरळकर,, सुशीला राजुसकर, भारती राठोड, मंगेश भेंडे, दिनेश महल्ले मंगेश साखरे, विजय राठोड यांनी ही पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली दिली तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सामुहिक अभिवादन करण्यात आलेआजादी का सुवर्ण महोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीं जी यांच्या संकल्पनेतून गावोगावी देश सेवेला समर्पित झालेल्या भारत मातेच्या सुपुत्रांचे स्मरणार्थ संगमरवरी दगडावर नांव रेखांकित करण्यात आले,, त्या वर्षापासून पोहा ग्रामपंचायत शहिद चि मारोती राऊत यांना ग्रामपंचायत चे वतीने मानवंदना देत आहे,, यंदा ही या भुमी पुत्राला मानवंदना देण्यात आली
सर्वप्रथम श्री गजानन धाडवे अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज संस्थान पोहा,, तथा वि. सदस्य ग्रामपंचायत पोहा, लोभासिग राठोड माजी पोलिस पाटील,, श्री, पांडुरंग जाधव सदस्य ग्रामपंचायत यांच्या करकमलाव्दारे मालार्पणन करण्यात आली, तसेच राऊत परिवाराचे वतीने श्री विश्वनाथ राऊत अध्यक्ष श्री संत गाडगेबाबा नागरी सहकारी पत संस्था कारंजा लाड, यांनी हारार्पन करून परिवाराची भावभिनी श्रद्धांजली अर्पण केली,, या प्रसंगी गावातील सर्व श्री, कुलदीप अवताडे सदस्य ग्रामपंचायत, सेवा निवृत्त मेजर, दिगंबर मरकम अध्यक्ष तंटा मुक्ती दिगंबर पाटील ढोकणे, दाऊद भाई, गजानन अळसपुरे कॉन्ट्रॅक्टर, सौ. रुख्मिणी राऊत अधिक्षिका कुंतामाता कन्याछात्रालय मुर्तिजापूर, पोहा ग्रामीण चे उभारते नेतृत्व श्री, दिपक मसने,, गणेश जाधव,, गजानन वर पोलीस पाटील, याशिवाय दिनकर उजवणे,, राजेद्र सोनोने मुर्तिजापूर, संतोसराऊत, उत्तम राऊत, गजान राऊत, तथा राऊत परिवाराचे सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होते, तसेचअसंख्य गावकरी शहीद सुपुत्रास मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सुत्रसंचालन,, श्री विश्वनाथ धाडवे, माजी मुख्याध्यापक वसंत विद्यालय पोहा, यांनी करताना शहीद चि, मारोती राऊत च्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकीत अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर देशसेवेसाठी सज्ज झालेला जवान, देशासाठी समर्पित झाला .
राऊत परिवाराचा पुत्र केवळ न राहता, पोहा गांवाची मान उंचवणारा सुपुत्र ठरला, हे आम्ही स्वाभिमानाने इतरांना सांगू शकतो,, तसेच अनुकरण करत गांवातील तरुणांनी देशसेवेसाठी सज्ज झाले पाहिजे, या प्रसंगी पुढे बोलताना सांगितले की,, वसंत विद्यालय गेली बेचाळीस वर्षापासून एका विद्यार्थ्यांची पुण्यतिथी साजरी करतात, हे अख्ख्या महाराष्ट्र राज्यातील एक मेव उदाहरण आहे, यातचं या विद्यार्थ्यांची महीमा लपलेली आहे तसेच श्री गजानन महाराज धाडवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यानंतर सामुहिक मौन श्रद्धांजली ने कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रामविकास अधिकारी श्री वडाल साहेब यांनी आभार प्रदर्शन केले, तसेच चि, मारोती राऊत यांची प्रतिमा येत्या प्रजासत्ताक दिनी लावण्यात यावी या सूचनेला अनुमोदन दीले, या कार्यक्रम आयोजित करुन मानवंदना देण्यासाठी उपस्थिती तांचे राऊत परिवाराचे वतीने श्री विश्वनाथ राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, श्री, बाळु पाटील ढोकणे, राठोड बाबु लिपिक,, शिपाई शिवदास यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे उत्तमोत्तम नियोजन पार पाडले





Social Plugin