प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ता 4 - तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज ता 4 रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
यावेळी तहसीलदाराना निवेदन देऊन ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा ता 1सप्टेंबर रोजीचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी केली आहे
निवेदनात म्हटले आहे की दि ०१ सप्टेंबर २०२५ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून शासन निर्णय क्र. सबीसी-२०२५/प्र.क्र.२१९/माक जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा-कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंवैधानिक आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे ४०० हून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून, त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात होणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे. त्यामुळे हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे
शिरपूर परिसरातील ओ बी सी बांधव मोटार सायकल रॅली ने मालेगाव शहरातील जुने बस स्थानकावर पोहोचले. तेथून रॅली कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ आली तेथून मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला तिथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
यावेळी उपस्थितना जी प सदस्य डॉ शाम गाभणे, समता परिषदेचे प्रदेश चिटणीस प्रा अरविंद गाभणे, शिवसेना (उबाठा )उप जिल्हा प्रमुख अशोकराव अंभोरे ॲड संदीप ताजने, कलीमभाई रेघीवाले, नंदकिशोर गोरे , सेवाराम आडे, नंदकिशोर उल्हामाले यांनी हा अध्यादेश रद्द करण्याची गरज विषद केली कार्यक्रमाचे संचालन डॉ विजय उल्हामाले यांनी केले
माजी जी प सदस्य मो.इमदादभाई डॉ आशिष वाघमारे, संतोष भालेराव अमित वाघमारे गजानन गाभणे अरुण बोबडे कैलास राऊत, रमेश इरतकर माजी प स सदस्य लक्ष्मण भांदुर्गे संतोष बाविसकर , दीपक काळे, सतीश शेंडे दिलीप विश्वंभर, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष जावेद भवानीवाले , कपिल भालेराव, सुनील आडे , ॲड सुभाषराव घुगे, वसंतराव लव्हाळे, चंद्रकांत गायकवाड, डॉ अशोकराव घुगे आदी उपस्थित होते





Social Plugin