Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी साजरा



  प्रतिनिधी भागवत खांदळे  

      मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे .हा सण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी 1948 मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली या दिवसाची दिनाचे औचित्य साधून तिरंगा फडकवून साजरा केला जातो. गोरेगाव येथील अप्पर तहसील  कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण अप्पर तहसीलदार अरुण पावडे मंडळ अधिकारी गोरेगाव कल्पना साळवी म बाभुळगाव दंडीमी महसूल अधिकारी  इंगोले व कडोळी ग्राम महसूल अधिकारी इंगोले जामठी सज्जा तलाठी  देशमुख  ग्रामविकास महसूल अधिकारी भांडे, पोलीस कर्मचारी ,जिल्हा परिषद शिक्षक वृंदा व विद्यार्थी गावातील ज्येष्ठ नागरिक हे अप्पर तहसील कार्यालयात कर्मचारी कैलास कावरखे गोवर्धन गिरी ,आकाश कावरखे हे यावेळी उपस्थित होते. 

तसेच ग्रामपंचायत कार्यालय गोरेगाव  येथे सुद्धा सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषद प्रशाला गोरेगाव येथे मुख्याध्यापकाचे  हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी पत्रकार उपस्थित होते. अशा प्रकारे गोरेगाव मध्ये व परिसरामध्ये विविध ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.