Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत विशेष ग्रामसभा संपन्न



 प्रतिनिधी शिवाजी हत्तीकर कवठे महांकाळ (जाखापूर)

त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्रीम प्रतिभा चव्हाण व सौ. सरपंच सिंधुताई सुतार, उपसरपंच श्री अतुल पाटील यांनी या योजनेची महाराष्ट्र शासन गावच्या विकासासाठी अनेक योजना /अभियान राबवत आहे. त्यातीलच एक महत्वाकांक्षी अभियान म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान. आपले गाव या अभियानात सहभागी होणार आहे. अर्थात आपल्या सर्वांचा सहभाग आणि मदत आवश्यक आहे. या अभियानात आपल्याला काय करावे लागेल, कोणत्या गोष्टींना अधिक महत्व द्यावे लागेल याचा विचार करणेसाठी व आपले गाव सध्या माझी वसुंधरा अभियानातून राज्याच्या नकाशा वरती आले आहे. या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आपण थोडे योगदान दिले तर आपल्या गावचे नाव देशाच्या नकाशावर यायला वेळ लागणार नाही यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा करून सविस्तर माहिती दिली.तसेच बचत गट crp यांनी बचत गटातील महिलांना विविध योजनांची माहिती दिली व या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आपण  मोठ्या संख्येने भाग घेऊन योगदान देऊ असे सांगितले. तलाठी सावंत मॅडम यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी सर्व ग्रामपंचायत आजी, माजी सदस्य, तलाठी, कृषी सहाय्यक, जि.प.शाळा मुख्याध्यापिका, हायस्कूल मुख्याध्यापक, आरोग्य अधिकारी cho, बचत गट crp, बचत गट सर्व महिला, अशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलिस पाटील सर्व क्षेत्रातील अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे आभार मानून सभा संपन्न झाली.