कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी
गुरूपिंप्री : सालबादा प्रमाणे याही वर्षी नवराञ उत्सावाच्या निमित्ताने गुरूपिंप्री येथे दि. 22 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे आयोजन महंत दत्तगिरी महाराज, ह.भ.प. कु. पद्माबाई महाराज गुरूपिंप्री यांच्या आशीर्वादाने व ह.भ.प. गुरूवर्य वामन महाराज बाहेकर अंभोरा यांच्या शुभ हस्ते सुरू होणार आहे. मागील 25 वर्षा पासून हा सप्ताह नियमित सुरु आहे, तरी या वर्षी वर्षे 26 वे वर्षे आहे. या वर्षी ही मोठ्या उत्साहात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे आयोजन दरवर्षी नवराञीच्या निमित्ताने केले जाते.
या नऊ दिवसाच्या नियोजना मध्ये दररोज सकाळी काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, दुर्गा माता आरती, संध्याकाळी, हरिपाठ व किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज संध्याकाळी नऊ दिवस किर्तन व दहाव्या दिवशी काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहात नऊ दिवस अनुक्रमे ह.भ.प. गोविंद महाराज शिंदे, पिरकल्याण,ह.भ.प. विष्णूपंत महाराज लोंढे, वानगांव बीड, ह.भ.प. कृष्णा महाराज नवले, पैठण, ह.भ.प. वामन महाराज बाहेकर, अंभोरा, ह.भ.प.डाॅ.अनिरूध्द महाराज क्षिरसागर, मुक्ती धाम आश्रम माळसावरगाव, ह.भ.प. गणेश महाराज कोल्हे, रामनगर, रामायनाचार्य ह.भ.प.राजेंद्र महाराज वाघमारे, गोंदी, तसेच शेवटच्या दिवशी दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजी गाथामुर्ती चांगदेव महाराज काकडे, काकडे कंडारी यांचे सकाळी 10 ते 12 याचे काल्याचे किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या किर्तनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. या सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे संयोजकाचा वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin