राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : सततच्या पावसामुळे शेतातील अतोनात नुकसान झाले आहे. दिनांक 8/ 9 /2025 ला रात्रीला अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे कलगाव येथील नाल्याला मोठा पूर आला होता.त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी असल्यामुळे शेतातील अनेक पिके ही खरडून गेली आहे. अशातच महागाव येथील शिलाबाई गुलाब इंगोले शेत सर्वे नंबर 39/3/अ यांच्या शेतात पूर्णतः शेतातील सोयाबीन खरडून गेली असून शेतात नाल्याचे सर्व पाणी शिरले आहे. आता सोयाबीन काढणीला आला असता, तोंडातील घास हिसकावून घेतल्यासारखे झाले आहे.
यांच्या शेताला लागूनच कलगाव चा मोठा नाला असून मागील वर्षी त्यांच्या शेताजवळ नाला रुंदीकरण खोलीकरण करून बंधारा बांधण्यात आला होता. परंतु ही बांध या नाल्याच्या पुरामुळे वाहून गेली आहे सर्व शेतात पाणीच पाणी असून शेतातील माती पिके पूर्णतः खरडून गेली आहे. शेतात मोठमोठे खड्डे पडले आहे. सध्या स्थितीत शेतीला नाल्याचे स्वरूप आले आहे. याच नाल्याच्या बाजूला असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशातच शासनाने लवकरात लवकर नुकसानीचा पंचनामा करून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी होत आहे.





Social Plugin