Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा लाड प्रशिक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आकाश कऱ्हे उपाध्यक्षपदी पांडूरंग भगत



कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 

कारंजा लाड येथील प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादितच्या अध्यक्षपदी आकाश भास्करराव कन्हे तर उपाध्यक्षपदी पांडूरंग भगत यांची सर्वानुमते अविरोध निवड झाली आहे

 सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात ही निवडणूक पार पडली. या निवडीसाठी पतसंस्थेच्या ११ संचालकपदासाठी ७ सप्टेंबररोजी झालेल्या निवडणुकीत विकास पॅनलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी संचालक आशिष बंड यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची घोषणा केली. संपूर्ण कार्यक्रमात संचालक व पतसंस्थेत कार्यरत कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते