Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मधील विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत सुयश .



बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

शालेय क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कोल्हापूर ,श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मधील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले . विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे व पर्यवेक्षक श्री नाना दडस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेत सहभाग घेऊन त्यामध्ये सिद्धार्थ विलास गोडसे इयत्ता सहावी यांनी 14 वर्षांखालील  योगासने या क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर त्याची निवड झाली आहे तसेच कु . सृष्टी धनंजय मखरे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय 48 ते 50 किलो वजन गटात सातारा जिल्हा किक बॉक्सिंग स्पर्धेत 17 वर्षाखालील  मुलींच्या वयोगटात दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक मिळवले .

तसेच 45 किलो वजनी गटात किंकबॉक्सींग स्पर्धेतील सतरा वर्षाखालील मुलींच्या वयोगटांमध्ये इ 9 वी विद्यार्थीनी कु.मनस्वी दत्तात्रय खवळे हिने द्वितीय क्रमांक मिळवला याबद्दल सर्व यशस्वी खेळाडूचे अभिनंदन दि मॉर्डन हायस्कुल व ज्युनी कॉलेज कोरेगाव चे सहशिक्षक  श्री आनंद शिंदे यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले . तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपसरपंच व सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य अभयसिंह राजेघाटगे ,प्राचार्य अंकुश भांगरे पत्रकार प्रकाश राजेघाटगे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,तसेच माता पालक संघ, बुध व बुध पंचक्रोशी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले या सर्व विद्यार्थ्यांना नाना दडस , नामदेव धनवडे  , संताजी देसाई यानी  मार्गदर्शन केले . तसेच विशेष मार्गदर्शन अजित पाटील व  सर्वशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही सहकार्य मिळाले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे यांनी केले तर आभार तानाजी पाटील यांनी मानले .