राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : कलगाव येथील सलमा परवीन व इस्लामोद्दीन शेख या दाम्पत्याचे तिन्ही सुपुत्र वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळविले असून सर्वात लहान मो.नादीर इस्लामोद्दीन याला दुसऱ्या फेरीत हैदराबाद येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाला असल्याने गावातील पहिला एम.बी.बी.एस डॉक्टर ठरणार आहे.
सलमा परवीन व इस्लामोद्दीन शेख या दामपत्याची आर्थिक स्थिती जेमतेम व शिक्षण ही माध्यमिक शाळेपर्यंत परंतु आई सलमा परवीन यांची जिद्द मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करायचे हे स्वप्न साकारत मोठ्या मुलगा मो.नदिम हा बी.एच.एम. एस.ची पदवी घेऊन अमरावती येथील दवाखान्यात सेवा देत आहे.तर दुसरा मुलगा शाहरुख बी.एम.एस.छाञसेवा म्हणून आरोग्यधाम मल्टीसेवा दिग्रस येथे सेवा देत आहे.आता तिसरा मुलगा मो.नादीर याने हैदराबाद येथील नोंवा इन्स्टीट्यूट आफ मेडिकल सायन्स हैदराबाद येथे एम.बी.बी.एस ला प्रवेश मिळाला असल्याने सलमा परवीन व इस्लामोद्दीन शेख यांच्या तिन्ही सुपुत्र वैद्यकीय क्षेत्रात उज्वल भविष्य घडवीत आहे. सर्वञ आनंद व्यक्त केला जात आहे. दिग्रस येथे नुकताच ईद ए मिलाद कार्यक्रमात तहसीलदार मयुर राऊत यांच्या उपस्थित सेवानिवृत्त न्यायमुर्ती संतोष जयस्वाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.





Social Plugin