प्रतिनिधी कवठे महांकाळ (जाखापूर)
शिवाजी हत्तीकर
मौजे जाखापूर येथे आज दिनांक 17/09/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली.
त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी या योजनेची महाराष्ट्र शासन गावच्या विकासासाठी अनेक योजना/अभियान राबवत आहे. त्यातीलच एक महत्वाकांक्षी अभियान म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान. आपले गाव या अभियानात सहभागी होणार आहे. अर्थात आपल्या सर्वांचा सहभाग आणि मदत आवश्यक आहे. या अभियानात आपल्याला काय करावे लागेल, कोणत्या गोष्टींना अधिक महत्व द्यावे लागेल याचा विचार करणेसाठी व आपले गाव सध्या माझी वसुंधरा अभियानातून राज्याच्या नकाशा वरती आले आहे. या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आपण थोडे योगदान दिले तर आपल्या गावचे नाव देशाच्या नकाशावर यायला वेळ लागणार नाही यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा करून सविस्तर माहिती दिली.
यावेळी सर्व ग्रामपंचायत आजी, माजी सदस्य, तलाठी, कृषीसहाय्यक, मुख्याध्यापक, आरोग्य अधिकारी, अशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलिस पाटील सर्व क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते उपस्थित सर्व अधिकारी, ग्रामस्थांचे आभार मानून सभा संपन्न झाली





Social Plugin