तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):- गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथील 'महारुद्र गणेश' मंडळांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गणेश उत्सवा. निमित्त विविध स्पर्धेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .महारुद्र गणेश मंडळ कटचिंचोली आयोजित कार्यक्रमाचे बक्षीस वितरण दि.०५/०९/२०२५ शुक्रवार रोजी पार पडला महिलांनी संगीत खुर्ची स्पर्धांमध्ये भाग घेतला, या स्पर्धेसाठी गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या स्पर्धेत प्रथम,द्वितीय,आणि तृतीय असे तीन क्रमांक निवडण्यात आले या तीनही क्रमांक येणाऱ्या महिलेला ' महारुद्र गणेश 'मंडळाच्या वतीने पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आल्या स्पर्धेच्या नंतर लगेचच बक्षीस वितरण सोहळा पार पडला यांमध्ये प्रथम क्र. सौ.सविता भारत तवले,द्वितीय क्र. सौ.अलका बळीराम खोटे आणि तृतीय क्र. सौ.सीमा संभाजी खोटे यांनी क्रमांक पटकाविला असून गावच्या सरपंच सौ.विजया रवींद्र निवारे यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले, या स्पर्धेसाठी महारुद्र गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील खोटे उपाध्यक्ष आदिनाथ पऱ्हाड व सर्व सदस्य आणि तरुण मंडळांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला गावातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.





Social Plugin