अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड शहरातील मत्स्योदरी देवी मंदिरातील दानपेटी शुक्रवारी उघडण्यात आली.दानपेटीत सोन्या चांदीच्या दागिन्यामध्ये सोन्याचे लहान मोठे ६९ मणी,चांदीचा ठोकळा, चांदीचा घोडा,नेपाळी चलन,सोन्याचे दोन डोळे व रोख रक्कम दोन लाख १९५० रुपयाची देणगी मिळाली.
दानपेटीची मोजदाद तहसीलदार तथा मत्स्योदरी देवी संस्थानचे अध्यक्ष विजय चव्हाण,नायब तहसीलदार तथा सचिव महेंद्र गिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्हीच्या निगराणीखाली विश्वस्त तथा पुजारी गीताविलास खुंटेफळकर,संस्थान व्यवस्थापक कैलास शिंदे,सेवानिवृत्त तलाठी सुरेंद्र पोद्दार,नामदेव राठोड, गोविंद काळे,दिगंबर खरात,अर्जुन शिंदे,शरद इरले,सत्यभान खरात, कैलास हरणे,विजय जाधव,दुर्गेश धुमाळ आदीची उपस्थिती होती.





Social Plugin