Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ जुनिअर कॉलेजचे कुस्ती स्पर्धेत उज्वल यश .



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे] 

शालेय क्रीडा  तालुकास्तरीय स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कोल्हापूर ,श्री नागनाथ विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज बुध मधील विद्यार्थ्यांनी  खटाव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले . विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे व पर्यवेक्षक श्री नाना दडस यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक राजेंद्र मदने 12वी यांने कुस्ती फ्रीस्टाइल 70 किलो वजनी गट 19 वर्षा खालील तालुक्यात प्रथम गोल्ड मेडल मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली . तसेच श्लोक राजेंद्र भोसले 11 वी तालुकास्तरीय प्रथम क्रमांक गोल्ड मेडल मिळवत जिल्हास्तरासाठी निवड झाली . याबद्दल प्राचार्य अंकुश भांगरे यांनी विद्यार्थी व पालकांचा सत्कार करून अभिनंदन केले . 

यशस्वी विद्यार्थ्यांना जुनियर कॉलेजचे विभाग प्रमुख प्राध्यापक विशाल नाळे, प्रा .श्रीनिवास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक ,प्राध्यापक यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपसरपंच व सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य अभयसिंह राजेघाटगे ,प्राचार्य अंकुश भांगरे ,पत्रकार प्रकाश राजेघाटगे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ,तसेच माता पालक संघ, बुध व बुध पंचक्रोशी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केल .  सर्वशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही सहकार्य मिळाले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे यांनी केले तर आभार तानाजी पाटील यांनी मानले