सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा (ता. १७ सप्टेंबर ) – भारतीय जनता पार्टी, सिंदखेडराजा तालुका यांच्या वतीने संतोष पवार यांची पक्षाच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीपत्रावर तालुका अध्यक्ष आनंद रूस्तुमराव देशमुख यांच्या स्वाक्षरीने अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.संतोष पवार यांना पक्षाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नियुक्तीबद्दल संतोष पवार यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, पक्षाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय जनता पार्टीच्या तालुका शाखेने त्यांचे अभिनंदन केले आहे.
उपस्थित संतोष पवार यांची भारतिय जनता पार्टी मध्ये युवा मोर्चा सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करताना जिल्हा अध्यक्ष गणेश दादा मांन्टे, माजी आमदार तोतरामजी कायंदे, जिल्हा आध्यक्ष युवा मोर्चा संतोष काळे पाटील, गजानन घुले जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मुंढे जिल्हा महामंत्री, जिल्हा युवा उपाधक्ष अशोक मेहेत्रे, जिल्हा उपाध्यक्ष विष्णु भाऊ मेहेत्रे ,युवा जिल्हा महामंत्री संतोष डोईफोडे, आनंद देशमुख तालुका अध्यक्ष सिंदखेडराजा मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली





Social Plugin