मन्सूर शहा धोत्रा भंनगोजी :---
दिनांक 11 सप्टेंबर रोजी तक्षशिला माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर भाष्य करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री वि दा. लहाने तर प्रमुख पाहुणे म्हणून परमंस मौनी बाबा शिक्षण संस्थेचें संचालक आत्माराम जी देशमाने तसेच प्राध्यापक डी एल जाधव हे उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक श्री विष्णू अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती सादर केली
त्यानंतर श्री विष्णू अवचार यांनी विविध प्रसंगांचे आधारे गाडगे महाराजांचे शिक्षणाविषयी अंधश्रद्धे विषयी विचार स्पष्ट केले त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री आत्माराम देशमाने यांनी विद्यालयाने राबवलेल्या या उपक्रमाची स्तुती करून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी देखील गाडगे महाराजां प्रमाणे माणसात देव शोधला व त्याची सेवा केली त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्था ंच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांना मदत केली आपणही संतांच्या मार्गावर चालून आपले जीवन आदर्श करावे असे आवाहन केले. अध्यक्ष भाषणामध्ये विद्यालयाचे प्राचार्य यांनी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ही भूमिका श्री विष्णू अवचार यांनी पार पाडली कार्यक्रमाचा शेवट पसायदानां नें झाला





Social Plugin