बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथे स्टॅंडर्ड क्लब ची स्थापना करण्यात आली असून भारतीय मानक ब्युरो अंतर्गत स्टॅंडर्ड रायटिंग हा पहिला उपक्रम राबवण्यात आला.
या शैक्षणिक वर्षात स्टॅंडर्ड क्लब मध्ये एकूण 60 विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बी.आय. एस. क्लबच्या मार्गदर्शिका सौ स्वाती जाधव बी. आय. एस संस्था, त्याची स्थापना, त्याचे उद्दिष्ट आणि त्याचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करत असताना घ्यावयाची काळजी व सावधानता'याबद्दलची माहिती दिली . .क्लबची विद्यार्थी प्रतिनिधी कु. गौरी बोराटे हिने सर्व विद्यार्थ्यांना मानक जनजागृती शपथ दिली. कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य श्री. गोफणे डी एन , पर्यवेक्षक श्री गुरव एम पी,
श्री चव्हाण .एम . एस, श्री शिवाजीराव चव्हाण, ,मयूर जाधव सर,आकाश यादव सर स्टँडर्ड क्लबचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते .सर्व विद्यार्थ्यांनी बिस्कीट उत्पादन या विषयावर स्टॅंडर्ड रायटिंग केले.यशस्वी विद्यार्थ्यांना बी. आय.एस. क्लबची ट्रॉफी व बक्षीस देऊन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला .भारतीय मानक संस्था पुणे ब्रँच अधिकारी मा.शुक्ला सर व फाउंडेशन चे सर्व माननीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. सर्वांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे आभार सौ अमृता जाधव यांनी मानले.





Social Plugin