Ticker

6/recent/ticker-posts

हरतखेडा ता.अंबड येथील सरपंच यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान भोवणार



*ग्रामसेवक श्री एस ए घुगे यांचा जाणून बुजून हलगर्जीपणा?
*गटविकास अधिकारी प स यांच्या दालनात दि १५.०९.२०२५ रोजी सूनावणीची नोटिस बजावली*


अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ


मौजे हरतखेडा तालुका अंबड जिल्हा जालना येथील ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा विराजमान न करता हेतूपुरस्कर पणे अभिवादन केले नव्हते.या गंभीर प्रकाराबाबत सर्व स्तरातून विद्यमान सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी यांचा सर्व स्तरातून निषेध नोंदवत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. 

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा सहशिक्षक अनिल भालेकर यांनी रीतसर पंचायत समिती अंबड व जिल्हा परिषद जालना यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. 

या तक्रारीच्या अनुषंगाने मा गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिति अंबड यांनी सदरील तक्रारीच्या अनुषंगाने सरपंच यांना दिनांक १५ सप्टेंबर रोजी सूनावणी साठी उपस्थित राहण्याचे सक्त निर्देश दिले आहे. 

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान व शासकीय नियमाची पायमल्ली कदापी सहन केल्या जाणार नसल्याचे अनिल भालेकर यांनी नमूद केले.सदरील गंभीर प्रकरणाबाबत प्रशासन स्तरावर योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करत वरिष्ठांकडे देखील दाद मागण्याची तयारी अनिल भालेकर यांनी केलेली आहे.

अंबड पंचायत गटविकास अधिकारी या गंभीर प्रकरणाबाबत सरपंच,ग्रामसेवकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून भविष्यात कुणीही आपल्या पदाचा गैरवापर न करता महापुरुषांचा आवमान करण्यास धजवणार नाही असा संदेश कायदेशीर कारवाईतून सर्व लोकनियुक्त पुढार्‍यांना नक्कीच मिळेल अशी भावना अनिल भालेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली.