बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ.राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल, पुसेगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांने घवघवीत यश संपादन केले. इयत्ता .९ वी मधील विद्यार्थी स्वराज गजानन चव्हाण या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय थांग -ता (तलवार बाजी) स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील गटामध्ये रौप्यपदक मिळवून यश संपादन केले.
स्वराजची पुढील २५ ऑक्टोबर रोजी गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली .. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक ठोंबरे सर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल व यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ सुरेश जाधव ,उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव , सचिव मोहनराव जाधव , खजिनदार लक्ष्मणराव जाधव व सर्व पदाधिकारी, गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी,प्रशासकीय अधिकारी डी.पी शिंदे तसेच मुख्याध्यापिका. कु धनश्री पोतदार यांनी अभिनंदन केले . मुख्याध्यापिका धनश्री पोतदार म्हणाल्या की स्वराजने राज्य स्थरावर शाळेचे नाव उंच केले तसेच इतर विद्यार्थीसुध्दा वेगवेगळ्या खेळामध्ये, परीक्षेमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करतात. अमरावती येथे झालेल्या स्पर्धेत जास्त पदके घेणारा सातारा जिल्हा प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. क्रीडा शिक्षक श्री ठोंबरे सर, प्रशिक्षक श्री अजित घाडगे सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व पालक यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .





Social Plugin