बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनी तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उत्तुंग यश प्राप्त केले असून चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
औंध ( ता.खटाव ) येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कु.वैभवी विक्रांत मदने हीने 33 किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच पै.फरान महंमद पठाण याने ३८ किलो वजन गटात तर ४५ किलो वजन गटात आयुष संतोष निकम व ७५ किलो वजन गटात पै.यशराज विठ्ठल गोडसे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला या कुस्तीगीरांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहेया कुस्ती स्पर्धेत विद्यालयाचे स्वराज सोमनाथ निकम , रिहान महंमद पठाण , विघ्नेश नितीन शेडगे, ओम अशोक तांबे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.डिस्कळ च्या श्री शिवाजी विद्यालयाने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित करुन दबदबा निर्माण केला. यशस्वी कुस्तीगीरांना वस्ताद पै.स्वप्नील मदने यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी कुस्तीगीरांचे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गोडसे, उपाध्यक्ष डॉ.अजय घाडगे, सचिव प्रा.सुनील दळवी, सर्व पदाधिकारी, सदस्य, तसेच मुख्याध्यापक आर एम डांगे, ज्येष्ठ उपशिक्षक सुनील वायदंडे, विलास काटकर, दत्तात्रय चव्हाण, अविनाश जंगम, सौ.संगिता कर्णे , पुरुषोत्तम सावंत, सौ.माधवी गोडसे , सौ.वैशाली फडतरे , बलराम घोरपडे, श्रीमती संगीता जाधव, अशोक माने, संताजी जाधव आदी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले .
छायाचित्र - डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उत्तुंग यश प्राप्त केले.
.jpg)




Social Plugin