Ticker

6/recent/ticker-posts

अनोखा उत्सव ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधव व श्रीकृष्ण गणेश मंडळाने एकत्रित रक्तदान शिबिर घेऊन दिला समाजाला एकतेचा संदेश...



मालेगाव प्रतिनिधी जावेद भवानीवाले / 


मालेगाव : - ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र पर्वानिमित्त ५ सप्टेंबर रोजी मालेगावात एक आगळावेगळा व समाजात एकोपा प्रस्थापित करणारा उपक्रम पार पडला मुस्लिम बांधवांनी पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या गोकुळ लॉज येथे प्रथम रक्तदान केले,त्यानंतर तेच मुस्लिम कार्यकर्ते थेट श्रीकृष्ण गणेश मंडळ येथे पोहोचले आणि तेथेही रक्तदान करून अनोख्या ऐक्याचे दर्शन घडवले याचबरोबर श्रीकृष्ण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केले वाशिम ब्लड बँकेच्या माध्यमातून आयोजित या शिबिराने एकतेचा नवा पायंडा घालून दिला एका दिवशी,दोन ठिकाणी मुस्लिम बांधव व हिंदू कार्यकर्त्यांनी रक्तदान करणे ही घटना मालेगावच्या सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी ठरली आहे हा उपक्रम पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत कौतुक व अभिमान दिसत होता रक्तदान म्हणजे समाजासाठी अमूल्य देणगी या अनोख्या रक्तदान उपक्रमाने ईद उत्सवाची खरी ओळख अधोरेखित केली की,धर्म साजरा करण्याचा खरा मार्ग म्हणजे मानवतेची सेवा होय गणेश मंडळ व मुस्लिम बांधवांनी मिळून केलेल्या या कार्यामुळे समाजात एकोपा,बंधुभाव व ऐक्याचा अनोखा संदेश पोहोचला आहे विशेष म्हणजे रक्तदान करून समाजात एकोपा,बंधुभाव आणि ऐक्याचे उदाहरण घालून दिले उत्सव म्हणजे फक्त रोषणाई,सजावट किंवा सांस्कृतिक कार्यक्रम एवढ्यावरच मर्यादित नसून,समाजासाठी उपयोगी असे कार्य करूनही साजरा करता येतो याचा सुंदर संदेश या शिबिरातून मिळाला हा उपक्रम पाहून सर्वच स्तरातून कौतुक होत असून,शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरलेला हा रक्तदान उत्सव "अनोखा उत्सव" म्हणून इतिहासात नोंदला जाईल.

पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांची प्रतिक्रिया

"ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम बांधव व श्रीकृष्ण गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी दोन ठिकाणी जाऊन रक्तदान करणे ही अत्यंत कौतुकास्पद व आदर्श घालून देणारी घटना आहे. समाजात सलोखा,बंधुभाव आणि एकोप्याचा मजबूत संदेश देणारा हा उपक्रम इतरांनीही आदर्श म्हणून घ्यावा."