Ticker

6/recent/ticker-posts

खरब खंडगांवात जश्ने मिलादुन्नबी उत्साहात साजरी



 ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 


मुखेड तालुक्यातील ग्राम खरब खंडगांव येथे जश्ने रजा कमिटीच्या वतीने इस्लाम धर्माचे संस्थापक हज़रत मोहम्मद पैगंबर सल्लालाहु व अलैहिव सल्लम यांच्या १५०० व्या जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार दि.५ सप्टेंबर रोजी मुख्य गाव परिसरातून 'जश्ने जुलूस' नाते पाकच्या गजरात मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.

सदरील जुलूसाला सकाळी १० वाजता सुरूवात झाली.सरपंच यांच्यावतीने बिस्कीट,चाॅकलेट,पाणी पाऊच आदि भेटस्वरूपात बांधवांना वाटप करण्यात आले.

हज़रत मोहम्मद पैगंबर साहेबांनी समता,न्याय,हक्क,अधिकार, बंधुभाव,सत्य अशा बाबींची अनुयायांना शिकवण दिली.त्यांचा जन्म झाला आणि तत्कालीन समाजातील अराजकता नाहीशी झाली.या कार्यक्रमात गावचे युवा सरपंच तथा पोलीस पाटील डाॅ.रणजित काळे,अविनाश काळे,योगेश काळे,हज़रत सलमान उर्फ बालेसाब शेख,गुलाम मोहम्मद, बँक सहाय्यक महमदरफी मदार आदमपूरकर व जश्ने मिलादुन्नबी रजा कमिटी सदस्य,मुस्लिम बांधव,गावकरी यांची उल्लेखनीय उपस्थिती होती