Ticker

6/recent/ticker-posts

एक गाव एक गणपती उत्सव



लाखांदूर तालुक्यातील मौजा दोनाड येथे एक गाव एक गणपती उत्सव दहा दिवसांपासून ओमकार सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने साजरा करण्यात आला.आज दिनांक 6/9/2025 रोज शनिवार ला गोपाल काला आयोजित करण्यात आला.

 या गोपाल काल्या प्रसंगी देवचंद कावळे यांनी आपल्या प्रस्थाविक भाषणातून सांगितले की आजच्या काळात सामाजिक कार्यासोबत धार्मिक कार्य होणे काळाची गरज आहे.आजच्या काळात युवा वर्गात धार्मिक कार्य झाले पाहिजे कारण आज युवा वर्ग हा भटकलेला आहे आणि युवा वर्ग कोठेही भटकु नये व समाजात एकोपा रहावा व गावात एकोपा राहुन गावाला विकासाच्या दिसेला नेणे आजच्या युवा वर्गाचे कार्य आहे.

  दोनाड येथे दहा दिवसीय गणेश उत्सवात ओमकार सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व आज दिनांक 6/9/2025 रोजी गोपाल काल्याचा कार्यक्रम करण्यात आले.