Ticker

6/recent/ticker-posts

कसुरा नदीवरील पुलावरून नागरिकांना करावी लागते जिव घेणी कसरत



श्रीष्टी प्रतिनिधि डी, डी, साबळे 

आज श्रीष्टी गावा जवळूनकसुरा नदी वाहत आहे थोडा जरी पाऊस झाला नदीवरील पुलावर लगेच वाढतेआणि नाईलाजाने नागरिकांना व वाहनांना जीवघेणा प्रवास करावा लागतो मागील इतिहास जर पाहिला तर दोन वर्षांपूर्वी याच पुलावरून एक बस वाहून गेली होती तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही गाढ झोपलेल्या प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे श्रीष्टी जवळील याच कसुरा नदीवरून शेगाव पंढरपूर हायवे गेला आहे त्या नदीवर मोठा पूल बांधण्यात येत आहे परंतु त्या पुलाचे देखील काम बंद पडले आहे त्यामुळे नागरिकांना याच जुन्या पुलाचा नाईलाजाने वापर करावा लागतो बाजारपेठ असलेल्या आष्टी माजलगाव तसेच परतुर तालुक्यातील बऱ्याच खेड्यांचा संपर्क तुटून जातो त्यामुळे जनजीवन मिसळून जाते या नदीवरील पुलाचे काम कधी पूर्ण होणार अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये आहे या नदीवरील पूल लवकरात लवकर बांधून हा पूलखुला करण्यासाठी व नागरिकांचे गैरसोय दूर करण्यासाठीलवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष सदाभाऊ शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे परतूर तालुका अध्यक्ष प्रभाकर प्रधान सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साबळे भरत साबळे सुदाम साबळे अनंता भारसाकळे लक्ष्मण खोत (वाडी )सामाजिक कार्यकर्ते राहुल तुरे अतुल तुरे राहूल शिरसाठ जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार हनुमंत दवंडे हे लवकरच प्रशासनाला भेटून यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आमचे प्रतिनिधि डी. डी, साबळे यांच्याशी बोलताना सांगितले