अमोल शितळे @नांदेड प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नई आबादी येळेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील प्राथमिक शिक्षिकेचा अमानुष प्रकार.
दिनांक 11 ऑक्टोंबर 2025 रोजी तोंडी परीक्षेत प्रश्नाचे उत्तर देता येत नसल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शिक्षिका कविता साळुंकी ह्या शिक्षिकेने वर्ग दुसरी शिकत असलेल्या संकल्प प्रवीण सावते वय वर्ष 7 ह्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली वरील प्रकरणात अर्धापूर प्राथमिक आरोग्य केंद्र मेडिकल करून सुद्धा अर्धापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार घेण्यास टाळाटाळ होत आहे. सदर रील प्रकरण रिपब्लिकन सेनेच्या निदर्शनात आले असता जिल्हा अध्यक्ष सुनील सोनसळे व जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण रावणगावकर महिला आघाडी महासचिव सुकेसणी बुक्तरे ताई गंगाधर पाईकराव रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष अक्षय सावते रिपब्लिकन सेना विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष यांनी जाऊन तात्काळ शाळा प्रशासनाला जाब विचारून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे विनंती केली.





Social Plugin