Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा शहरा मध्ये घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड



 कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे 

कारंजा लाड  स्थानिक आसमानी नगर येथे घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड करण्यात येथील शहर पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १३ हजार रुपये रोख आणिएक मनगटी घड्याळ जप्त करून या गुन्ह्याची उकल केली आहे.

स्थानिक के. एन. कॉलेज जवळ आसमानी नगर असून, येथील रहिवासी फिर्यादी अब्दुल जावेज मजीद आसमानी यांच्या  घरचे कुलुपबंद करून संपूर्ण कुटुंबासह हजयात्रेसाठी बाहेरगावी गेले होते. ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता परिवारासह घरी परतले असता त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा ताजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांच्या घरातील कपाटातून ५० हजार रूपये रोख व ५०० रुपये किमतीची एक काळया रंगाची मनगटी घड्याळ असा एकूण ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी नोंदवलेल्या कारंजा शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. फॉरेन्सिक तज्ञ, सीसीटीव्ही फुटेज व नागरिकांची विचारपूस तथा रेकॉर्डवरील चोरांचे बयान या आधारे पोलिसांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी याप्रकरणी अट्टल चोरटा हसन उर्फ ईम्मी छडू निमसुरवाले (४० , रा. गवळीपुरा) यास दुपारी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून रोख १३ हजार रुपये व एक मनगटी घड्याळ जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अनुजतारे, अप्पर पोलीस अधिक्षक लता फड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी व पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार, पोलिस कर्मचारी मयुरेश तिवारी, अजय धनकर, उमेशकुमार बिबेकर, नितीन पाटील, अनिस निमसुरवाले, अमित भगत, मोहम्मद परसुवाले आदींनी केली आहे