Ticker

6/recent/ticker-posts

मोफत नेत्र शिबिर



 प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण न्युज देवानंद महाजन 

निवघा (बा) ता हदगाव येथे डाॅ कमलकिशोर ना. तावडे तळणीकर चेअरमन पैनगंगा को. आॅ. बॅक नांदेड यांच्या सौजन्याने मोफत नेत्र शिबिर आयोजित केले होते. सदरील शिबिरामध्ये 400 मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत. तसेच सदरील शिबिरामध्ये 35 रूग्नांचे डोळ्यांचे आॅपरेशन करावयचे होते ते मा डॉ कमलकिशोर ना. तावडे यांनी मोफत करून दिले. 

डॉ. सचिन जैन साहेब व पत्रकार सुदर्शन कर्हाळे, निवघा येथील  पैनगंगा शाखेचे शाखाधिकारी श्रीकांत बहादुरे, विजय धनगरे, महाजन शिवकुमार, नंदनवार राजेंद्र, पांडुरंग तावडे, तावडे दत्तराव, महाजन विशाल, . इत्यादी च्या हस्ते रूग्नांच्या गाडीचे पुजन करून गाडी पाठवून दिली. खरंतर डॉ कमलकिशोर ना तावडे यांनी जनु समाज सेवेचा वसाच घेतला आहे. जे बोलतात ते करूनचं दाखवतात. 

काही दिवसांपूर्वी शिरड ता हदगाव येथे ही साहेबांनी नेत्र तपसणी शिबिर घेतले. तसेच अमगव्हाण येथेही नेत्र तपासणी शिबिर घेतले आहे. वरील दोन्ही गावातील ज्यांच्या डोळ्याचे आॅपरेशन करावयाचे आहे त्यांना लवकरच मोफत आॅपरेशन करीता डाॅ कमलकिशोर ना तावडे हे घेऊन जाणार आहेत. 

खरं तर असे समाज सेवक राजकीय पदावर पाहिजे आहेत. कारण जरं स्वत खर्च करून रुग्नांची सेवा करीत असतील तर राजकीय पदावर असल्यास आनखी मोठ्या प्रमाणात जनतेची सेवा करीतल असे निवघा _तळणी सर्कल मधील सुजांन नागरिक बोलवून दाखवत आहेत.