Ticker

6/recent/ticker-posts

बिअर बार मालकावर जीवघेणा हल्ला; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल, सर्व आरोपी फरार



चक्री शिवारातील ‘हॉटेल मैत्री बार’मध्ये सूपवरून किरकोळ वाद; बार मालक व भावावर बाटल्या व चाकूने हल्ला


हदगाव प्रतिनिधी : देवानंद महाजन 

हदगाव तालुक्यातील चक्री शिवारातील हॉटेल मैत्री  बार येथे २२ ऑक्टोबर रोजी, बुधवारच्या रात्री झालेल्या भांडणाने हिंसक वळण घेतले. सूप खारट झाल्याच्या किरकोळ कारणावरून ग्राहक व बिअर बार मालकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत बारचे मालक रामेश्वर गिरी आणि त्यांचा भाऊ गजानन गिरी हे गंभीर जखमी झाले असून, हदगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील  रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या एकाची प्रकृती स्थिर असल्याचे दुसऱ्या ची गंभीर आहे जमलेल्या माहितीतून समजते.

प्राप्त पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारच्या रात्री मुख्य चार आरोपी व इतर 15 जण जेवणासाठी मैत्री बिअर बार येथे आले होते. त्यांनी सूप मागितले सुख खारट  झाल्याने या कारणावरून बारमालक रामेश्वर गिरी यांच्याशी ग्राहकांचा वाद झाला. काही वेळानंतर हेच ग्राहक उंचेगाव येथून आपल्या साथीदारांना घेऊन परत आले आणि त्यांनी पुन्हा बारमध्ये येऊन दोघा भावांशी शिवीगाळ व वाद घातला. वाद वाढताच त्यांनी अचानक हल्ला चढवला.

या हल्ल्यात आरोपींनी रामेश्वर गिरी यांच्या डोक्यावर बिअरच्या बाटल्या फोडून त्यांना रक्तबंबाळ केले, तर त्यांच्या भावावर चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. बार परिसरात एकच गोंधळ उडाला.  मदतीने दोघा भावांना तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून दोघांना पुढील उपचारासाठी नांदेड  रुग्णालयात हलविले.रामेश्वर गिरी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणात शिवाजी बर्डे, शिवाजी देशमुख, प्रशांत शिंदे, करण देशमुख आणि इतर १४ ते १५ जणांनी संगनमत करून हल्ला केला असल्याचे नमूद केले आहे.

या घटनेनंतर हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बर्गे करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा केले असून, आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेमुळे चक्री परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी व हॉटेलधारक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.