हदगाव प्रतिनिधी देवानंद महाजन
निवघा बा येथील महावितरणच्या अभियंते जावडेकर यांना गेली एक महिना होऊन गेला आहे तरी गावठाण मधील रोहित्र परिसरात मोठ्या प्रमाणात तणकट, आणि वेली सारखे वेल पूर्णतः रोहितला चारही बाजुने वेडा घातला आहे,निवघा शहराला दोन लाईनमन असुन कोणत्याही प्रकारची कामे न करता केवळ वेळ काढु पणा करित आहे
सदरील वार्ड क्रं १ मधे गेली तीन महिने झाले व्होल्टेजच येत नाही लाईनमन पंकज कदम यांना वारंवार सांगितले तरीही जाणिव पुर्ववक दुर्लक्ष केले जाते.लाईट जर गेली तर दुरूस्ती साठी तासंतास नागरिकांना ताटकळत ठेवले जाते या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी महावितरण कडे तणनाशक फवारणीसाठी उपलब्ध नाही असे सांगून वेळ काढु पणा करित असतात अशा कामचुकार अधिकार्यावर निवघा बा येथील वार्ड क्रं १ मधील नागरिकात चर्चेला उधाण आले आहे





Social Plugin