प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा,आंध्रुड येथे दिनांक 18 ऑक्टोबरला दिपावली निमित्त वर्ग 1 ते 8 विद्यार्थ्यांची आकाशकंदील व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून सुंदर आकाशकंदील बनविले. मुलांनी अतिशय उत्साहाने तल्लीन होऊन चित्रांमध्ये रंग भरले व आकाशकंदील बनविले.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे या प्रमुख उद्देशाने या दोन स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये क्रमांक काढून विद्यार्थ्यांना रोख बक्षीस वितरण करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद,समाधान व उत्साह पाहण्यासारखा होता.





Social Plugin