Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक श्री विठ्ठल रामजी चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा



शिक्षक श्री विठ्ठल रामजी चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा !

ग्रामीण प्रतिनिधी  ,महमदरफी मदार आदमपुरकर 

आज चांडोळा_तांडा ता. मुखेड येथे माध्यमिक आश्रम शाळा शिराढोण ता. कंधार येथे रुजू असलेले शिक्षक श्री_विठ्ठल_रामजी_चव्हाण यांचा सेवापुर्ती गौरव या सोहळ्यास उपस्थित राहून श्री. चव्हाण गुरुजी यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. प्रारंभी बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. आपल्या 29 वर्षांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. त्यांच्या पुढील आयुष्यात तुम्हाला आनंद, आरोग्य आणि उत्तम क्षण लाभोत, हीच सदिच्छा व्यक्त केले.

यावेळी खुशालराव पाटील उमरदरीकर, लक्ष्मणराव पाटील खैरकेकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर, व्यंकटराव लोहबंदे, माधवदादा राठोड, नागनाथ लोखंडे, मनोज कांबळे, शिवलिंग नाईक, गणेश पाटील, सुधीर चव्हाण, शिवाजी राठोड, बाळु नाईक जुन्नेकर, प्रेमदास राठोड, सचिन चव्हाण, सोमेश दबडे, सुनील चव्हाण, गोवर्धन चव्हाण, भीमराव चव्हाण, नारायण राठोड, अनिल राठोड सह रामची नाईक सेवाभावी संस्था सेवा गौरव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समस्त गावकरी मंडळी आदी उपस्थित होते.