हदगांव प्रतिनिधी/ देवानंद महाजन दि
बरडशेवाळा येथे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात बुधवार दि.23 ऑक्टोबर रोजी बरडशेवाळा येथील भुमिपुत्र मराठवाड्यातील पहिले रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ डॉ शिवाजीराव पोले यांच्या आयोजनातुन गावकऱ्यांना प्रेरणादायी ठरेल यासाठी गावातील विविध क्षेत्रात काम करत असलेले भुमिपुत्रासह दिपावली निमित्त सुट्टी वर आलेल्या भारतीय सैनिकांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
यावेळी हदगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक व्यक्त करीत बहुमूल्य मार्गदर्शन केले.यावेळी गावातील भुमिपुत्राचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी भुमिपुत्रासह सरपंच ज्ञानेश्वर मस्के , पोलिस पाटील दत्तात्रय मस्के, वैद्यकीय अधिकारी डॉ एस बी भिसे, जमादार रावले, भारतीय सैनिक दत्तराव धरमुरे ,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक श्रीनिवास मस्के यांनी केले तर आभार बालरोग तज्ज्ञ डॉ मंगेश मस्के यांनी केले





Social Plugin