Ticker

6/recent/ticker-posts

लोणी गणातून बाळासाहेब आजबे यांचे कट्टर समर्थक बाबासाहेब भिटे यांना उमेदवारी द्यावी -



समाजसेवक अशोक कुताळ 

आष्टी,  महाराष्ट्र ग्रामीण

आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदाराच्या बाळासाहेब काका आजबे यांचे निकटवर्तीय असलेले सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब भिटे हे मागिल अनेक वर्षापासुन सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात तळमळीने काम करत आहेत. म्हणून त्यांनाच शिराळ गणातून ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) अजित दादा पवार पक्षाने होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी समाजसेवक व आजबे काका यांचे विश्वासू अशोक कुताळ यांनी केली आहे.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून राजकीय वातावरण तापलेलेआहे. अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून लोणी गणाच्या विकासासाठी गावच्या विकासासाठी 

युवा नेते बाबासाहेब भिटे यांनी अनेक कामे करून गावामध्ये विकास घडून आणला आहे. समाज उपयोगी, सामाजिक, धार्मिक, कार्यामध्ये तत्पर राहन गोर गरिब सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कामे केली आहे. त्यांचा राजकीय क्षेत्रात 20 वर्षापासून दांडगा अनुभव असल्याने ते नेहमी समाज उपयोगी कामामध्ये अग्रेसर असतात त्यांनी केलेल्या विकासभिमुख कामांमुळे बाबासाहेब भिटे यांच्या सारख्या सर्व सामान्यांशी नाळ असलेल्या व तळमळीच्या कार्यकर्त्यांला लोणी गणातून पंचायत समितीची उमेदवारी देऊन संधी द्यावी

अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या गणातील कट्टया-कट्ट्यावर आणि राजकीय वर्तुळात केवळ एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे बाबासाहेब भिटे काम करणारे हात थांबले तरी विचार पुढे जातात, अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थ आता तरुण पिढीकडून नव्या ऊर्जेची आणि विकासाची अपेक्षा करत आहेत. तरुण आणि सुशिक्षित नेतृत्व गणाच्या विकासाला नवी दिशा देईल, त्यांचे या मतदारसंघात फ्रेंड सर्कल व नाते मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) अजित दादा पवार पक्षाने उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित आहे. असे मत सुंबेवाडी गावचे समाजसेवक व आजबे काका यांचे विश्वासू अशोक कुताळ यांनी केली आहे.