Ticker

6/recent/ticker-posts

अंभोरा पोलीस स्टेशन कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदतीचा हात स.पो.निरीक्षक. मंगेश साळवे



अशोक कुताळ आष्टी प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी महापुराने शेतकरी मजूर आणि सामान्य कुटुंबाचे घरदार व शेती उध्वस्त केली असून आंबोरा पोलीस स्टेशन कडून मदतीचा हात मनात २१ हजाराचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केला आहे अतिवृष्टी ने महापुराने अनेक कुटुंबाचा उपजीविकेचे साधनही वाहून वाहून गेले आहे. या अस्मानी सुलतानी आपत्तीच्या काळात अंभोरा पोलीस स्टेशन तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत फुल ना फुलाची पाकळी याअभियानाद्वारे थोडासा हातभार लावण्यात आला. असून २१हाजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केला आहे. अंभोरा पोलीस 

स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या योगदानाचा आकार लहान असला तरी यातून व्यक्त होणारी सहानुभूती माणुसकी आणि सामाजिक जबाबदारी मोठी आहे. असे पोलीस निरीक्षक, मंगेश साळवे म्हणाले. पुढे बोलताना अंभोरा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक. साळवे म्हणाले संकटाच्या काळात माणसाला पैशापेक्षा जास्त गरज असते ती कोणती त्यांच्यासोबत आहे. हाच खरा आधार आपत्तीच्या काळात दिलासा देणे हाच खरा नागरी धर्म हिच खरी माणुसकी आणि हीच खरी महाराष्ट्राची खरी परंपरा पोलीस अधिकारी व

कर्मचाऱ्यांच्या या मदतीमुळे प्रभावित कुटुंबांना धैर्य आणि आधार मिळेल अशी अपेक्षा आहे. स्थानिक लोकांनी एकजुटीने मदतीचा हात पुढे करावा असे आव्हान स.पो. निरीक्षक, मंगेश साळवे यांनी केले आहे.