– संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष. या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने केली रस्त्याची दुरुस्ती
गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा तालुक्यातील पोहा ते मोरळ या 4 किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर प्रवास करणे मोठ्या संकटाचे ठरू लागले होते. संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर. मोटरसायकलस्वार आणि चारचाकी वाहनधारकांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असून अनेक अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले असता यामुळे अनेक वाहनचालकांना पाठीचा व कंबरेचा त्रास सुरू झाला असून, अनेकजण गंभीर दुखापतींना सामोरे जात होते. महाराष्ट्र ग्रामीण न्युज या बातमीची दखल घेऊन सदर प्रशासनाने रस्ता दुरुस्ती अखेर करण्यात आले व शेवटी नागरिक प्रशासनाचे आभार व्यक्त करीत आहे.
.jpg)




Social Plugin