प्रतिनिधी सोमनाथ काळे
शिवनगर विद्या प्रसारक येथील वार्षिक सर्वसाधारण सभा आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत विद्यार्थ्यांशी निगडित विविध प्रश्न समजून घेतले. त्याचप्रमाणे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना, ते जगात कुठेही शिक्षण घेत असले तरी, आवश्यक शैक्षणिक सवलती आणि सुविधा पुरवण्याचं आश्वासन यावेळी दिलं. याशिवाय स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
याचबरोबर संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सखोल आणि धोरणात्मक चर्चा करण्यात आली. शिक्षणाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा तसंच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नव्या उपक्रमांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला.





Social Plugin