Ticker

6/recent/ticker-posts

देवरी–शेगांव मार्गावर पाटसुळ रेल्वे फाट्याजवळ एक चारचाकी वाहनाचा अपघात



राजेश दामोदर 

 देवरी–शेगांव मार्गावर पाटसुळ रेल्वे फाट्याजवळ आज सकाळी एक चारचाकी वाहनाचा अपघात झाला. वाहनाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले असून गाडीत असलेले सहा महिन्यांचे बाळ सुखरूप असल्याचे समजते.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही .स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण समजून घेण्यासाठी तपास सुरू आहे.