कासटबारी (26 ऑक्टोबर सुरगाणा)
सुरगाणा तालुक्यात कासटबारी येथे पावसामुळे भाताची खूप नुकसान झाले काल 4.00वाजेपासून तर रात्री भर पाऊस तर सकाळी 7.00 वाजेपर्यंत सुरू होतो भाताची नुकसान झाल्याने शेतकरी पाऊसाने वैतागले नेमकं करायचं काय? हे प्रश्न त्यांच्या मनात. मे महिन्यापासून पाऊस चालू असताना अनेक शेतकऱ्यांचे नुकसान आता तरी उघड असे म्हणत.सरकारला एकच मागणी की नुकसान झालेल्या शेतीची नुकसान भरपाई लवकरच द्यावी . पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची दिवाळी वाया गेली असून त्यांना या पीक काढणीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे . काही ठिकाणी या नुकसानासाठी सरकारी मदत जाहीर करण्यात आली आहे तरीही निकषांनुसार भरपाई पुरेशी नसल्याने चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे .





Social Plugin