अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
अंबड - पारनेर सर्कल गट - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पारनेर सर्कल गटामध्ये मोठी राजकीय चर्चा रंगली आहे.या गटातून भारतीय जनता पक्षाचे (BJP) धडाकेबाज नेतृत्व,मा.सुनिल खांडेकर यांनी पारनेर पंचायत समितीची निवडणूक लढवावी,अशी एकमुखी मागणी स्थानिक नागरिक,विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.सुनिल खांडेकर यांच्या नेतृत्वाकडे केवळ एका गटाचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
*जनाभिमुख आणि दबंग कारभारामुळे लोकांचा विश्वास*
सुनिल खांडेकर यांच्या दबंग कार्यशैलीमुळे आणि त्यांनी केलेल्या विविध जनहितकारक कामांमुळे स्थानिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत विशेष उत्सुकता आहे. त्यांनी नेहमी समस्यांच्या वेळी लोकांमागे न राहता, त्यांच्या पुढे राहून मदतकार्य केले आहे.शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या असोत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी असोत किंवा अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ दिलासा देण्याचे काम असो,खांडेकर यांनी वेळोवेळी स्वतःउपस्थित राहून मदतीचा हात दिला आहे आणि लोकांचा ठाम विश्वास संपादन केला आहे.त्यांची ही जनाभिमुख कार्यशैली सर्व समाजघटकांना आकर्षित करत आहे.
विकासकामांचा धडाका आणि जनतेची मागणी
खांडेकर यांनी स्थानिक पातळीवर सातत्याने विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे.गावांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असून,त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये पुलाचे बांधकाम, स्मशानभूमीची सोय,धनगर पिंपरी ते नागझरी रस्त्याचे खडीकरण आणि धनगर पिंपरी येथील तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून केलेले प्रभावी कार्य यांचा समावेश आहे.त्यांच्या या प्रयत्नांचे आज सर्वत्र कौतुक होत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “सुनिल खांडेकर हे केवळ नेते नाहीत,तर कार्यकर्त्यांचे आणि सामान्य लोकांचे आधारवड आहेत.” भाजपचे दमदार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे खांडेकर हे जनमानसात अत्यंत प्रिय आहेत.
भाजपच्या रणनीतीतही प्रभावी उमेदवारीची चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जिल्हा पातळीवरील निवडणुकीच्या रणनीतीमध्येही सुनिल खांडेकर यांचे नाव प्रभावी आणि निश्चित उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
एकूणच,पारनेर सर्कल गटामध्ये सुनिल खांडेकर यांच्या उमेदवारीबाबतची जनभावना अत्यंत प्रबळ असून,ही मागणी आगामी निवडणुकीचे चित्र बदलू शकते.आता सुनिल खांडेकर या जनभावनेचा आदर करून कोणता निर्णय घेतात,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.





Social Plugin