प्रतिनिधी/विश्वराज वाकोडे
नांदेडच्या भूमीवर इतिहास पुन्हा घडला,आदिवासी समाज एकदिलाने उठला आणि गर्जला आज झालेल्या उलगुलान आदिवासी जनआक्रोश मोर्चा मध्ये हजारो समाज बांधव रस्त्यावर उतरले.त्यांच्या डोळ्यात संताप होता,छातीत ज्वाला होती आणि घोषणांमध्ये क्रांतीचा आवाज होता.आदिवासी झोपलेला नाही
आदिवासी घाबरलेला नाही आदिवासी सज्ज आहे,आपल्या हक्कासाठी लढायला! अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्की भाऊ जाधव यांनी व्यासपीठावरून स्पष्ट सांगितलं.आरक्षणावर डाका टाकणाऱ्यांना आम्ही रस्त्यावर उतरून उत्तर देऊ!”या ऐति हासिक मोर्चात माहुर विधानसभेचे आदिवासी आमदार भिमराव जी केराम साहेब,आदिवासी समाजाचे अभ्यासक तज्ञ संजय दाभाडे सर, कळमनुरी मतदारसंघचे संतोष टारपे साहेब, माजी सदस्य सतिश पाचपुते साहेब आणि लक्की भाऊ यांचे सहकारी युवराज भैया बर्डे
आणि अनेक आदिवासी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.मोर्चा ठिकठिकाणी थरथर कापणाऱ्या घोषणा देऊन दुम दुमला “बंजारा हटावआदिवासी बचाव!“बोगस हटाव आदिवासी बचाव “हैदराबाद गॅझेट मुर्दाबाद”आदिवासी विरोधात जाणाऱ्या सरकारचा मुर्दाबाद.आमच्या हक्कावर डाका घालायचा विचारही करू नका.आदिवासी आरक्षणावर हात टाकलात, तर महाराष्ट्र पेटेल.आम्ही जंगलातले, पण जंगली नाही.आम्ही विचारवंत, लढवय्ये आणि स्वाभिमानी आहोत.हा मोर्चा शांततेत झाला,पण त्यातून उठलेली लढ्याची ज्योत आता विझणार नाही.हा उलगुलान फक्त आजचा नाही.हा पुढच्या पिढ्यांचा शपथविधी आहे आपलं आरक्षण टिकवण्यासाठी, आपला सन्मान जपण्यासाठी आपण एकदिलाने उभे राहिलो.
ज्यांना आरक्षणाचं मोल माहिती नव्हतं,त्यांनी आज त्याची खरी ओळख पटवली.मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध, जोशपूर्ण आणि यशस्वी पार पडला.अन्यायाविरुद्ध आदिवासी समाज एक आहे,आणि आरक्षण व अस्तित्वासाठी कोणतीही तडजोड होणार नाही.





Social Plugin