Ticker

6/recent/ticker-posts

ज्या जमीनीवर बोर विहीर व पाटाची नोंद आहे अशा सर्व जमीनी बागायती क्षेत्र म्हणून नुकसान भरपाई द्या ...



सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष श्री.कल्याणराव देशमुख आक्रमक* 

*प्रतिनिधी:-लक्ष्मण बिल्हारे*

ज्या शेतामध्ये बोर विहीर व पाट गेलेला आहे अशी शेतजमीनीच्या सातबारा वर नोंद आहे अशा सर्व जमीनधारकांना अतीवृष्टीचे अनुदान बागायती म्हणून देण्यात यावे कारण ज्यावेळी रजिस्ट्री ऑफिस मधे मुद्रांक शुल्क  आकारण्यात येते म्हणजे ज्यावेळी शासनाची तिजोरी भरायची त्यावेळेस या जमिनी बागायती म्हणून दाखवल्या जातात व अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी या जमिनी जिरायती दाखवल्या जातात असा दुजाभाव केल्याचे व्यधा शेतकऱ्यांनी शेवगा/सारवाडी गावचे सरपंच तथा सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष श्री.कल्याणराव देशमुख यांच्याकडे मांडल्याने श्री.कल्याणराव देशमुख यांनी सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष नात्याने जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन या जमिनीसाठी बागायती क्षेत्र म्हणुन अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.