सेलू तालुक्यातील हदगाव पावडे येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. आमदार विजयराव भांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कार्यकर्ता सावंद मेळावा उत्साहात पार पडला. या बैठकीस तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते आणि गावपातळीवरील जबाबदार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकर्त्यांना संबोधित करताना मा. आ. विजयराव भांबळे साहेब यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद या आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पक्ष संघटनेच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर सर्व ताकदीने लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
या बैठकीत तांदुळवाडी येथील भाजपचे माजी सरपंच प्रशांत जाधव, उपसरपंच दत्तराव हरकळ यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच गिरगाव झिंबरे येथील काशिनाथ किसन झिंबरे, कल्याण बाबासाहेब झिंबरे आणि इतर कार्यकर्त्यांनीही मा. आ. विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
बैठकीचे सूत्रसंचालन श्री. परवेज सौदागर यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. सुधाकर रोकडे यांनी सादर केले. कार्यक्रमात राजेंद्र लहाने, आप्पासाहेब डख, बालाजी हरकळ आणि रामेश्वर गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठकीमुळे हदगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे संघटन अधिक सज्ज झाल्याचे यावेळी स्पष्टपणे जाणवले.





Social Plugin