बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव ता.खटाव येथील लेखक दिनेश फडतरे यांच्या रँडम या ललित लेख संग्रहाला संतनगर ,कांगोणी ता.नेवासा जि.अहिल्यानगर येथील श्री संत किसन महाराज सुडके ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा" श्री संत किसन महाराज सुडके जीवन गौरव पुरस्काराने " सन्मानित करण्यात आले.. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचे हस्ते आणि माजी आमदार पांडुरंग अभंग, श्री.बाळकृष्ण महाराज सुडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ...स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल असं पुरस्काराचे स्वरुप आहे..लेखक दिनेश फडतरेंच्या गौरवशाली पुसेगाव, आठवकल्लोळ या पुस्तकांनाही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत.अश्वमेध ग्रंथालयाचा अक्षरगौरव पुरस्कार, ज्ञानवर्धिनी वाचनालय,खेडभाळवणीचा पुरस्कार, मराठी वाडःमय परिषद बडोद्याचा पुरस्कार, कवयित्री शांता शेळके पुरस्कार,मंचर,स्पंदन पुरस्कार हे त्यापैकी काही पुरस्कार आहेत.समाजमनाचा ठाव घेणारे ललित लेखन अशी दिनेश फडतरे यांची ओळख आहे...त्यांनी ग्रामीण जीवनावरील लेख, आठवणीवरील लेख आणि संवेदनशील लेख अशा वेगवेगळ्या विषयांवर अनेक लेखांचे लिखाण केले आहे...
या पुरस्काराबद्दल त्याचे अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी,कार्यवाह ,.सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी,श्री सेवागिरी देवस्थान पुसेगावचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डाॅ.सुरेश जाधव,सर्व विश्वस्त, पुसेगावचे उपसरपंच विशाल मोहनराव जाधव, सर्व सदस्य,महाराष्ट्र साहित्य परिषद,, पुसेगाव, खटाव तालुका साहित्यिक कट्टा , विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी श्री दिनेश फडतरे यांचे अभिनंदन केले.





Social Plugin