Ticker

6/recent/ticker-posts

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोयाबीनची ऑनलाइन नोंदणी सुरू

 

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे केले आव्हान - सभापती अवधूत नाना खडके* 

 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,पुणे अंतर्गत अंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुख्य बाजारपेठ वडीगोद्री तालुका अंबड येथे सोमवार दि.३ रोजी सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली.असून तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५३२८ रुपये भाव देण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कल्याण चोथे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या सोयाबीन विक्रीची ऑनलाईन नोंदणीसाठी ७/१२ च्या उताऱ्यावर सोयाबीनचा पिक पेरा सन-२०२५-२६ चा आवश्यक आहे.याशिवाय आधार कार्ड,बँक पासबुक झेरॉक्स प्रत करून सह कागदपत्राची पूर्तता करून घ्यावी.कृषी उत्पन्न बाजार समिती अंबड व मुख्य बाजारपेठ वडीगोद्री येथे ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे..